या ग्रंथामधून भारतीय उद्योगाचा ‘बीजपुरुष’ म्हणून महाराजा सयाजीरावांची ओळख आपल्याला होते
सयाजीरावांनी राबवलेले औद्योगिक धोरण, कृषी-औद्योगिक विकासाची केलेली पायाभरणी व उद्योगधंद्याचे कुशल व्यवस्थापन आणि बडोद्यातील औद्योगिक शिक्षणाची व प्रशिक्षणाची केलेली सोय या सर्वातून भारताच्या औद्योगिक विकासाचे एक ‘सयाजी मॉडेल’ आकाराला आलेले आपणास दिसून येते. आज भारताने हे मॉडेल शेती आणि उद्योगाची स्थिती सुधाण्यासाठी अग्रक्रमाने स्वीकारावे असेच आहे.......